आव्हाळवाडीतील दत्तविहार परिसरात रात्री जाळला जातोय कचरा

नागरिकांची कारवाईची मागणी; धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

वाघोली :  लोकवस्तीच्या अगदी जवळील मोकळ्या माळरानावर दररोज रात्री मोठ्या प्रमाणात कचरा जाळला जात आहे. कचरा जाळल्यानंतर निर्माण होणाऱ्या दाट धुराचे लोट थेट लोकवस्तीत पसरत असल्याने नागरिकांना श्वसनाचा त्रास, डोळ्यांची जळजळ, घशाचा त्रास होत असल्याने दत्तविहार परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.  

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, वाघोली परिसरातील कचरा आणून या ठिकाणी टाकला जात असून रात्रीच्या वेळी तो पेटविला जातो. यामध्ये प्लास्टिक, रबर, कागद तसेच इतर घातक पदार्थांचा समावेश असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या कचऱ्यामुळे निर्माण होणारा धूर वाऱ्यासोबत थेट घरांमध्ये येत असल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनाच्या समस्या असलेल्या व्यक्तींना मोठा त्रास होत सहन करावा लागत आहे. लोकवस्तीच्या जवळ कचरा जाळण्याचा प्रकार तातडीने थांबविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या प्रकाराची तातडीने दखल घेऊन संबंधित ठिकाणी पाहणी करून कचरा जाळणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या क्षेत्रीय अधिकारी (फिल्ड ऑफिसर) रेखा टोंगरे यांच्याशी संपर्क केला असता, प्रत्यक्ष पाहणी करून कचरा जळणाऱ्यांना नोटीस देवून कारवाई केली जाईल असे सांगितले.  

वाघोली परिसरातील कचरा याठिकाणी आणून टाकला जात आहे. रात्रीच्या वेळी हा कचरा जाळला जात असल्याने धुराचे लोट वस्तीत येतात. त्यामुळे आम्हा नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन कचरा जाळण्याचा प्रकार बंद करावा. – स्थानिक नागरिक  

Download in JPEG Format

DM Admin

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button

You cannot copy content of this page