तलवार बाळगल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
लोणीकंद पोलिसांची कारवाई
वाघोली : पुणे अहिल्यानगर महामार्गावर रामचंद्र इन्फ्रा ऑफिस समोर लोखंडी तलवार बाळगून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तिघांवर लोणीकंद पोलिसांच्या तपास पथकाने कारवाई करून ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी लखविंदर बलकार सिंग, गुरमितसिंग बळवंत सिंग, निरवेरसिंग बलकार सिंग यांच्यावर भारतीय हत्यार कायद्यान्वये लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यांच्याकडून दोन तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. बारावा मैल येथे काही व्यक्ती दंगा करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्याठिकाणी गुरमितसिंग व निरवेरसिंग हे त्याठिकाणी हातात तलवार घेऊन थांबल्याचे दिसले. पोलिसांनी मोठ्या शिताफीने तिघांनाही ताब्यात घेऊन कारवाई केली.










