​कायदा मोडणाऱ्यांची गय नाही – उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजित काइंगडे यांचा इशारा

गणेशोत्सवात संस्कृतीचे भान ठेवा; सिल्लोडला शांतता समितीची बैठक संपन्न

​सिल्लोड : गणेशोत्सव हा श्रद्धा, संस्कृती आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव आहे. त्यामुळे उत्सवाच्या नावाखाली निषेधार्ह सदृश प्रकार, इतर धर्मीयांच्या भावना दुखावणारे कृत्य होऊ नये, याची आयोजकांनी दक्षता घ्यावी. कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजित काइंगडे यांनी दिला.

​गणेशोत्सवानिमित्त पोलीस प्रशासनाच्या वतीने शांतता समितीची बैठक घेण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रकाश जाधव बैठकीला उपस्थित राहणार होते; मात्र काही कारणास्तव ते उपस्थित राहू शकले नाहीत. बैठकीत मार्गदर्शन करताना उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजित कांगडे यांनी उत्सव काळातील कायदा सुव्यवस्थेबाबत पोलिसांची भूमिका स्पष्ट केली.

​नगरपरिषद, महावितरण आणि गणेश मंडळांनी दरवर्षीप्रमाणे आवश्यक व्यवस्था व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. उत्सव काळात कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचेही बैठकीत सांगण्यात आले.

​या बैठकीस पोलीस निरीक्षक शामसुंदर कोठाळे, दिनकर गोरे, रवींद्र ठाकरे, सपोनी सुधीर मोटे, पवन इंगळे, प्रमोद भिंगारे, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कायंदे, धम्मदीप काकडे, राजेंद्र बनकर, अनिल धानोरे, नायब तहसीलदार बळीराम मुंडे, उपनगराध्यक्ष विठ्ठलराव सपकाळ, उपमुख्याधिकारी अजगर पठाण, निवृत्त प्राचार्य एन.बी. चापे, वीज वितरण अभियंता धम्मपाल मस्के, दुर्गाताई पवार, शांतीलाल अग्रवाल, नगरसेवक शेख इम्रान गुड्डू, शेख बाबू भिकन, कृष्णा लहाने, माजी उपनगराध्यक्ष शकुंतलाताई बनसोड, नगरपरिषद अधीक्षक सय्यद शहबाज आदींसह विविध गावांचे पोलीस पाटील, महिला दक्षता समितीच्या महिला पदाधिकारी, विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी तसेच राजकीय व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

सूत्र संचालन पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे यांनी केले तर पोलीस निरीक्षक शामसुंदर कोठाळे यांनी आभार मानले.

» ​डीजेंऐवजी कलागुणांना वाव द्या

​गणेशोत्सव साजरा करताना कर्कश वाद्यांना फाटा द्या. धार्मिक कार्यक्रमांचे पावित्र्य जपत कलागुणांना प्रोत्साहन द्या. प्रत्येक कार्यक्रमासाठी आवश्यक परवानगी घ्या. कोणत्याही धर्माच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची आयोजकांनी दक्षता घ्यावी. डीजेचे आगाऊ पैसे परत मिळवून देण्यासाठी मदत करू, असे सांगत त्यांनी धार्मिक कार्यक्रमांना पाश्चिमात्य स्वरूप देण्याऐवजी संस्कृतीचे जतन करण्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी काइंगडे यांनी केले.

» २१० प्रतिबंधात्मक कारवाया

​गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी २१० प्रतिबंधात्मक कारवाया केल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

Download in JPEG Format

DM Admin

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button

You cannot copy content of this page