केसनंद येथील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी अंडरपास किंवा उड्डाणपुलाचा प्रस्ताव

एमएसआयडीसीकडून प्रशासकाला पत्र

वाघोली : केसनंद (ता. हवेली) येथील वाघोली-राहू राज्यमार्ग क्रमांक ६८ वरील केसनंद चौकातील वाढत्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी अंडरपास किंवा उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडून (एमएसआयडीसी) तयार करण्यात आला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार हा प्रस्ताव पुढे आला असून, याबाबत महामंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांनी ग्रामपंचायत केसनंदच्या प्रशासकांना अधिकृत पत्राद्वारे माहिती दिली आहे.

प्रस्तावित अंडरपास किंवा उड्डाणपुलाच्या कामाचा विचार करून केसनंद चौक ते कोणार्क एक्सोटिका गेट कमानीपर्यंतच्या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण सध्या तात्पुरते वगळण्यात आले आहे. मात्र, वाहतूक सुरळीत राहावी यासाठी या मार्गावरील खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीस योग्य स्थितीत ठेवण्यात येणार आहे.

दरम्यान, केसनंद चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी चौकातील सर्व अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच वाहतुकीला अडथळा ठरणारे विद्युत खांब तातडीने स्थलांतरित करण्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

या प्रस्तावित अंडरपास किंवा उड्डाणपुलाच्या कामासाठी निधी उपलब्ध होणे आवश्यक असून, निधीअभावी प्रस्तावाला मंजुरी मिळण्यास काही प्रमाणात विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणी योग्य त्या तातडीच्या उपाययोजना करून सहकार्य करण्याचे आवाहन एमएसआयडीसीकडून पुणे प्रादेशिक विकास प्राधिकरणास करण्यात आले आहे.

केसनंद चौकातील वाहतूक कोंडीमुळे स्थानिक नागरिक, विद्यार्थी, कामगार आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अंडरपास अथवा उड्डाणपुलाचा प्रस्ताव प्रत्यक्षात कधी येतो, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

केसनंद चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने या ठिकाणी अंडरपास किंवा उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला ही सकारात्मक बाब आहे. निधीअभावी कामाला विलंब होऊ नये, यासाठी शासनस्तरावर आवश्यक तो पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच अतिक्रमणे हटविणे व विद्युत खांबांचे स्थलांतर यांसारख्या तातडीच्या उपाययोजना करून वाहतूक सुरळीत करण्यास प्राधान्य दिले जाईल. –  ज्ञानेश्वर कटके (आमदार, शिरूर-हवेली)

Download in JPEG format

DM Admin

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button

You cannot copy content of this page