वाघोली पोलिसांच्या हद्दीतील तडीपार पिस्टलसह जेरबंद

वाघोली पोलिस तपास पथकाची कारवाई

वाघोली : पुणे जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आलेल्या वाघोली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एकास केसनंद येथून जेरबंद केले असून त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल व २ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

 तानाजी अर्जुन जाधव (वय २६ रा. केसनंद) असे जेरबंद करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाघोली पोलीस तपास पथक सोमवारी (दि. ७ सप्टेंबर) रात्री हद्दीत गस्तीवर असताना पुणे जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आलेल्या आरोपी केसनंद राधास्वामी सत्संग जवळ आला असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस हवालदार प्रदीप मोठे यांना मिळाली. त्यानुसार तपास पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. त्याचेकडून ४१ हजार रुपये किंमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. त्याला अटक करून त्याचेविरूढ भारतीय हत्यात कायद्यान्वये वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवशंकर राघू करत आहेत.

​सदरील कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त अविनाश कुमार, सहाय्यक पोलीस आयुक्त अनिता मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) पल्लवी मेहेर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मंगेश जगताप, पोलीस उपनिरीक्षक शिवशंकर राघू, सहा. पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब मोराळे, पोलीस हवालदार प्रदीप मोटे, पोशि ऋषिकेश व्यवहारे, पोशि विशाल गायकवाड, पोशि पांडुरंग माने, पोशि मारुती वाघमारे, अशोक शेळके, पोशि महादेव कुंभार, पोशि भोरडे, पोशि शिंदे, पोशि घावटे, पोशि गोरे यांनी केली आहे.

Download in JPEG format

DM Admin

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button

You cannot copy content of this page