रेकॉर्डवरील तीन गुन्हेगार पुणे जिल्ह्यातून हद्दपार

वाघोली : गणेशोत्सवच्या पार्श्वभूमीवर वाघोली पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरील तीन रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर हद्दपारची कारवाई करण्यात आली आहे. संबंधितांना संपूर्ण पुणे जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले असून, १० सप्टेंबर रोजी या आदेशांची बजावणी करण्यात आली.

दत्ता रंगनाथ गायकवाड (वय २९, रा. दुबे नगर, वाघोली), महेश देवराम लोंढे (वय २६, रा. दुबे नगर, वाघोली), रीना संजय रजपूत (वय ३५, रा. भावडी रोड, वाघोली) असे हद्दपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

वाघोली पोलीस स्टेशन हद्दीतील व लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत अभिलेखावरील आरोपींमुळे वाघोली व परिसरातील नागरिक दबावाखाली वावरत होते. सदर आरोपींवर कायद्याचा वचक बसावा, या उद्देशाने रेकॉर्डवरील गुन्हेगारी अभिलेखाची अभ्यासपूर्वक तडीपारीचा प्रस्ताव तयार करून पोलीस उपायुक्त अबिनाश कुमार यांच्याकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी पाठवला होता. सदर प्रस्तावावर कार्यवाही करत अविनाश कुमार यांनी पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून एकास १ वर्षासाठी, तर इतर दोघांना ६ महिन्यांसाठी तडीपार केले आहे.

गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करून नागरिकांच्या निर्भयतेच्या  दृष्टीने ही कारवाई करण्यात आली आहे.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त अविनाश कुमार, सहा. पोलीस आयुक्त अनिता मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) पल्लवी मेहेरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मनोज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक विजय चंदन, सर्व्हेलन्स पथकाचे पोलीस अंमलदार सागर कडू, कमलेश शिंदे, राकेश गायकवाड यांनी केली आहे.

वाघोली पोलिसांनी मागील दोन महिन्यांत एकूण ७ सराईतांना तडीपार केले आहे. यापुढे वाघोली पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे किंवा संघटित स्वरूपात गुन्हे करून दहशत निर्माण केल्यास त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवून अशा प्रकारची कारवाई केली जाईल. – नंदकुमार गायकवाड (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाघोली)

Download in JPEG format

DM Admin

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button

You cannot copy content of this page