​जिंतूर-येलदरी-इटोली रस्त्यासाठी ३४० कोटी

पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची माहिती; अवघ्या दोन महिन्यांत होणार कामाला सुरुवात

परभणी : (मोहन कदम) जिंतूर-येलदरी-सेनगाव या मार्गाऐवजी जिंतूर-येलदरी-इटोली-सावळी मार्ग पोखर्णी असा होणार असून ३४० कोटींच्या या कामाला दोन महिन्यांत प्रत्यक्षात सुरुवात होण्याची शक्यता आहे. पहिल्यांदा ग्रामीण भागात हा सिमेंट रस्ता होणार आहे. यासाठी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी प्रयत्न केले.

​जिंतूर-येलदरी-सेनगाव या ३४ किमीच्या मार्गासाठी ३४० कोटी मंजूर केले होते. या मार्गाचे टेंडर लवकरच होईल, अशी शक्यता असताना पुढे हा मार्ग येलदरीपासून सेनगावला जाणार होता. मात्र, येलदरी ते सेनगाव हा रस्ता काही दिवसांपूर्वीच नव्याने करण्यात आला. त्याच रस्त्यावर परत रस्ता करण्याऐवजी येलदरीपासून उर्वरित रस्ता इटोली-सावळी मार्ग पोखर्णी असा वळविला तर या भागातील ग्रामस्थांना त्या रस्त्याचा फायदा होईल. त्यामुळे उर्वरित १९ किलोमीटर जिंतूर तालुक्यातील ग्रामीण भागात हा सिमेंट रस्ता वळविण्याच्या संदर्भात पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सार्वजनिक बांधकाम विकास मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानंतर या रस्त्याला मान्यता देण्यात आली असून या रस्त्याचे अवघ्या दोन महिन्यांत काम सुरू होणार आहे.

»​ अनेक दिवसांच्या प्रयत्नांनंतर यश 

​जिंतूर-येलदरी हा १५ किलोमीटरचा रस्ता खराब अवस्थेत होता. १५ किमीसाठी एक तास लागत होता. वारंवार ग्रामस्थांनी आंदोलने केली. त्यानंतर जिंतूर-सेनगाव रस्त्यासाठी ३४० कोटी मंजूर झाले. मात्र, पुढे हा रस्ता सेनगावला जाण्याऐवजी जिंतूर तालुक्यातील ग्रामीण भागात जोडला गेला तर त्याचा फायदा होईल असा सूर निघाल्याने हा रस्ता या मार्गे वळवण्यात आला.

» ​पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचा पाठपुरावा 

​ग्रामस्थांनी रस्ता वळवण्याच्या संदर्भात मागणी केल्यानंतर पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्र्यांची भेट घेऊन हा रस्ता ग्रामीण भागात वळवण्याची विनंती केली व सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी त्यास मान्यता दिल्याने हा मार्ग आता सोयीस्कर बनला आहे. पंचायत समितीच्या सदस्य रंजना बालाजी सांगळे यांनी पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्यानंतर त्यास तत्त्वतः मान्यता मिळाली आहे.

​यासाठी साबां विभागाच्या वतीने सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. हे लवकरच पूर्ण होणार असून त्यानंतर टेंडर होऊन कामास सुरुवात होणार आहे. ३४ किलोमीटरचा हा सिमेंट रस्ता जिंतूर तालुक्यातील ग्रामीण भागाला जोडणारा दुवा राहणार आहे.

» २५ गावांना जोडणारा रस्ता 

​जिंतूरहून निघालेला हा सिमेंट रस्ता पुढे शेवडी-माणकेश्वर-येलदरी-मुमखेडा-हिवरखेडा-सावळी-इटोली मार्ग पोखर्णीपर्यंत व आडगाव-पोखर्णीपर्यंत येणारा सिमेंट रस्ता जो पुढे चिंचोली दराडे-चिंचोलीगुट्टे-वस्सा-आसेगाव-दुधगाव- साडेगाव-सावंगी खुर्द मार्ग मुख्य जिल्हा रस्त्याला मिळणार आहे.

Download in JPEG Format

DM Admin

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button

You cannot copy content of this page