हवेलीत ५ कोटी ५५ लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ

आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या उपस्थितीत भूमिपूजन; रस्ते, पाणीपुरवठा, आदी पायाभूत सुविधांना मिळणार बळ

वाघोलीहवेली तालुक्यातील विविध गावांमध्ये पंचायत समिती हवेली, जिल्हा नियोजन समिती तसेच इतर विकास निधीतून तब्बल ५५ कोटी ५५ लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. शनिवारी (दि. १३ सप्टेंबर) आमदार ज्ञानेश्वर आबा कटके यांच्या प्रमुख उपस्थितीत या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, विविध गावांतील पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आव्हाळवाडी, मांजरी खुर्द, कोलवडी, थेऊर, कुंजीरवाडी, उरुळी कांचन, लोणी काळभोर आणि कदमवाकवस्ती या गावांमध्ये विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छता, पायाभूत सुविधा तसेच पालखी मार्गांच्या विकासकामांचा समावेश आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच गावागावातील पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी या निधीचा उपयोग होणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अनेक अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, पुणे-सोलापूर रोडवरील कुंजीरवाडी येथे उभारण्यात येत असलेल्या नवीन जनसंपर्क कार्यालयाची आमदार ज्ञानेश्वर आबा कटके यांनी पाहणी केली. नागरिकांना आपल्या समस्या, अडचणी तसेच विकासकामांबाबत थेट संवाद साधता यावा, या उद्देशाने हे कार्यालय उभारण्यात येत असून, लवकरच ते नागरिकांच्या सेवेत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

शिरूरसह हवेलीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. नागरिकांना आवश्यक त्या मूलभूत सुविधा मिळाव्यात, यासाठी पायाभूत विकासकामांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. आगामी काळात हवेलीच्या विकासासाठी आणखी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असून, गावागावात विकासाची कामे अधिक गतिमान केली जातील. – ज्ञानेश्वर आबा कटके  (आमदार, शिरूर-हवेली)

Download in JPEG Format

DM Admin

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button

You cannot copy content of this page