मित्रासोबत दुचाकी वरून फिरायला गेलेल्या युवतीचा अपघातात मृत्यू

येरवड्यातील बीआरटी मार्गात बसला दुचाकी धडकली

येरवडा : समोरून येणाऱ्या पीएमपीएल बसला दुचाकीने जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी चालक युवतीचा  मृत्यू झाला. तर मागे बसलेला तिचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात येरवड्यातील डेक्कन कॉलेज चौकात बीआरटी मार्गात झाला.

अपघातात दिघी येथील साडेसतरा वर्षीय युवतीचा मृत्यू झाला असून तिचा मित्र प्रतीक दौलत मोहोड (वय २४, रा. बोपखेल दिघी) हा गंभीर जखमी झाला आहे. पोलिस अंमलदार सागर जगताप यांनी तक्रार दिल्यानंतर अपघाताची नोंद येरवडा पोलिस ठाण्यात झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास पीएमपीएल बस क्रमांक( MH 14 HU -5382)हि मार्ग क्र.99 पुणे मनपा ते विश्रांतवाडी मार्गावरील बस येरवड्यातून डेक्कन कॉलेज मार्गे विश्रांतवाडी कडे बीआरटी मार्गातून चाललेली होती. चंद्रमा चौकातून डावीकडून वेस्पा दुचाकी क्र.(MH 14KK 8736)वरून आलेली युवती व प्रतीक यांची बीआरटी मार्गातून येणाऱ्या पीएमपीएल बसला समोरासमोर जोरदार धडक बसली.या भीषण अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच ऋतुजा हिचा मृत्यू झाला होता. प्रतीक हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. प्रतीक आणि ऋतुजा हे दोघे मित्र होते. रविवार च्या दिवशी ते फिरायला गेले होते, काळाने अचानक झडप घातल्याने दोघांच्याही कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरिक्षक अमर कदम करत आहेत.

DM Admin

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button

You cannot copy content of this page