अतिक्रमण कारवाईचा घेतला धसका

वाघोली-भावडी रोडवरील दुकानदारांकडून स्वतःहून अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात; महापालिकेच्या धडक कारवाईचा परिणाम

वाघोली : ( राहुल बागल ) वाघोली येथील बावडी रोडवर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने केलेल्या धडक कारवाईचा चांगलाच धसका दुकानदारांनी घेतला आहे. प्रशासनाच्या कारवाईपूर्वीच परिसरातील दुकानदारांनी स्वतःहून पुढाकार घेत रस्त्यालगतची अनधिकृत अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केली आहे

वाघोली-भावडी रोडवर रस्त्यालगत झालेल्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. तसेच पादचाऱ्यांनाही ये-जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने केलेल्या कारवाईनंतर दुकानदारांनी सामंजस्याची भूमिका घेत स्वतःची अतिक्रमणे काढून प्रशासनाला सहकार्य केले.

दुकानदारांनी स्वयंस्फूर्तीने अतिक्रमणे हटविल्यामुळे भावडी रोड मोकळा होण्यास प्रशासनाच्या कारवाईला नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने ही बाब निश्चितच स्वागतार्ह आहे.

दरम्यान, रस्ता पुन्हा अतिक्रमणांच्या विळख्यात सापडू नये, यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने नियमित देखरेख ठेवून अतिक्रमणमुक्त रस्त्यांची स्थिती कायम राखावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Download in JPEG Format

DM Admin

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button

You cannot copy content of this page