मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त वाघोलीत रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर

नगरसेविका रत्नमाला सातव यांच्याकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी तीन लाखांची आर्थिक मदत

वाघोली : केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री तथा पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त वाघोली येथे भव्य रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. नगरसेविका रत्नमाला संदीप सातव, भाजपा पुणे जिल्हा सरचिटणीस संदीप सातव आणि उपसरपंच महेंद्र भाडळे यांच्या पुढाकारातून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी अनेकांनी रक्तदान केले, तर आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना विविध आरोग्य तपासण्या व मार्गदर्शनाचा लाभ मिळाला. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शिबिराला भेट देऊन पाहणी केली आणि नागरिकांशी संवाद साधला.

या उपक्रमामध्ये नगरसेविका रत्नमाला संदीप सातव यांनी दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी तीन लाख रुपयांचा धनादेश मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सुपूर्द केला. संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याच्या सामाजिक बांधिलकीतून ही मदत देण्यात आली.

वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान, आरोग्य तपासणी आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत अशा विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा कंद, नगरसेवक रामभाऊ दाभाडे, नगरसेवक सुरेंद्र पठारे, नगरसेवक शैलेजीत बनसोडे, नगरसेवक अनिल सातव, भाजप पुणे जिल्हा सरचिटणीस संदीप सातव यांच्यासह मित्रपरिवार व सहकारी उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. वाढदिवस केवळ उत्सव म्हणून साजरा न करता सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे, या भावनेतून दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांसाठी तीन लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. अडचणीच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे.

– रत्नमाला सातव  (नगरसेविका, मनपा, पुणे)

रक्तदान हे श्रेष्ठदान असून, एखाद्याला जीवनदान देण्याचे सामर्थ्य त्यात आहे. मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त वाघोलीत आयोजित रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद समाधानकारक आहे. अशा सामाजिक उपक्रमांमुळे आरोग्याबाबत जनजागृती होण्याबरोबरच समाजात सेवाभावी वृत्ती वाढीस लागते.

– महेंद्र भाडळे  (माजी उपसरपंच, वाघोली)

मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त समाजाच्या विविध घटकांना लाभ होईल असे उपक्रम राबविण्याचा आमचा संकल्प आहे. रक्तदान, आरोग्य तपासणी आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत अशा उपक्रमांतून सामाजिक उत्तरदायित्व जपण्याचा प्रयत्न केला आहे. नागरिकांचे आरोग्य आणि शेतकरी बांधवांचे हित यांना प्राधान्य देत भविष्यातही असे सामाजिक उपक्रम राबविणार आहोत. – संदीप सातव  (सरचिटणीस, पुणे जिल्हा, भाजपा)

Download in JPEG Format

DM Admin

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button

You cannot copy content of this page