विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी ‘अटल युवा सुरक्षा कक्ष’ हेल्पलाईन सुरू 

भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते मुंबईत अनावरण; नोकरीतील फसवणूक, सायबर गुन्हे, शैक्षणिक प्रश्नांसह युवकांच्या समस्यांना मिळणार व्यासपीठ

मुंबई : विद्यार्थी, युवक आणि युवतींना भेडसावणाऱ्या विविध समस्या, आर्थिक फसवणूक, सायबर गुन्हे, शैक्षणिक अडचणी तसेच सुरक्षिततेच्या प्रश्नांवर मदत व मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या ‘अटल युवा सुरक्षा कक्ष’ हेल्पलाईनचे अनावरण आज मुंबई येथे भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले.

आजच्या काळात शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नोकरीचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणे, ऑनलाइन फ्रॉड, सायबर गुन्हे, करिअरविषयक मार्गदर्शनाचा अभाव तसेच युवक-युवतींच्या सुरक्षिततेशी संबंधित प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहेत. या पार्श्वभूमीवर युवकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी आणि त्यांना योग्य मदत मिळवून देण्यासाठी ‘अटल युवा सुरक्षा कक्ष’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ओंकार तुपे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

विद्यार्थी आणि युवकांसमोर शिक्षण, रोजगार, आर्थिक फसवणूक, सायबर गुन्हे तसेच सुरक्षिततेचे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. अनेकदा योग्य मार्गदर्शन आणि मदत मिळत नसल्याने तरुणांना अडचणींचा सामना करावा लागतो. हीच गरज ओळखून ‘अटल युवा सुरक्षा कक्ष’ हेल्पलाईन सुरू करण्याची संकल्पना मांडली. या माध्यमातून युवकांच्या समस्या केवळ ऐकून न घेता त्यांचे निराकरण होईपर्यंत पाठपुरावा करण्याचा आमचा प्रयत्न राहील. – ओंकार तुपे (भारतीय जनता युवा मोर्चा)

Download in JPEG Format

DM Admin

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button

You cannot copy content of this page