सायबर फसवणुकीतील १ लाख रुपये परत

येरवडा पोलिसांच्या सायबर पथकाची कामगिरी

​पुणे :  येरवडा पोलीस स्टेशनच्या सायबर तपास पथकाने प्रभावी पाठपुरावा करत एका नागरिकाची ऑनलाईन आर्थिक फसवणूक झालेली संपूर्ण एक लाख रुपयांची रक्कम परत मिळवून देण्यात यश मिळवले आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, येरवडा येथील रहिवासी असलेल्या सूरज पाटील यांनी एका ऑनलाईन लिंकवर क्लिक केल्याने त्यांची एक लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाली होती. याप्रकरणी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये ऑनलाईन तक्रार दाखल करण्यात आली होती.

​तक्रार प्राप्त होताच येरवडा पोलीस स्टेशनच्या सायबर पथकाने तातडीने हालचाल करत संबंधित बँक आणि मर्चंट यांच्याशी सातत्याने पत्रव्यवहार व दूरध्वनीद्वारे संपर्क साधून प्रभावी पाठपुरावा केला. या प्रयत्नांमुळे फसवणुकीची संपूर्ण एक लाख रुपयांची रक्कम अर्जदाराला पुन्हा मिळवून देण्यात पथकाला यश आले.

​सदरील कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त चिलुमुला रजनिकांत, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील जैतापुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शारदा कोकाटे आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) केशव दिंडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश राठोड, पोलीस हवालदार समीर पिलाने, पोलीस अंमलदार मनोज भागवत, स्वप्निल पिंगळे, विजय माने यांनी केली आहे.

Download in JPEG Format

DM Admin

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button

You cannot copy content of this page