‘हॉटेल प्रमिला’ फॅमिली रेस्टॉरंट लवकरच सेवेत
खवय्यांसाठी पर्वणी!; काळ्या मसाल्यातील व्हेज-नॉनव्हेज पदार्थांची मेजवानी

वाघोली : वाघोली, आव्हाळवाडीसह परिसरातील खवय्यांसाठी एक आनंदाची बातमी असून, ‘हॉटेल प्रमिला’ हे व्हेज आणि नॉनव्हेज फॅमिली रेस्टॉरंट लवकरच ग्राहकांच्या सेवेत दाखल होत आहे. काळ्या मसाल्याच्या खास चवीतील विविध पारंपरिक आणि खमंग भाज्या एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा उपक्रम या रेस्टॉरंटच्या माध्यमातून राबवला जाणार आहे.
या फॅमिली रेस्टॉरंटमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारच्या पदार्थांची मोठी रेलचेल पाहायला मिळणार आहे. व्हेज (शाकाहारी) मेनूमध्ये शेवगा फ्राय, शेवगा मसाला, अख्खा मसूर, शेव भाजी, बेंगण मसाला यांसह इतर अनेक स्वादिष्ट प्रकारांचा समावेश असणार आहे. तर नॉनव्हेज (मांसाहारी) मेनूमध्ये चिकन मसाला, चिकन फ्राय, मटण मसाला, मटण फ्राय, टिक्काचे विविध प्रकार तसेच तंदूरचे वेगवेगळे प्रकार खवय्यांना चाखायला मिळणार आहेत.
हे नवे रेस्टॉरंट वाघोली-आव्हाळवाडी रोड, लाईफ केअर हॉस्पिटल शेजारी येथे सुरू होत आहे. संचालक करण थोरात आणि रोहित थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सुसज्ज पार्किंगस या फॅमिली रेस्टॉरंटची उभारणी होत असून, कौटुंबिक वातावरणात काळ्या मसाल्याच्या चवीचा आस्वाद घेता येणार असल्याने लवकरच सुरू होणाऱ्या या रेस्टॉरंटकडे खवय्यांचे लक्ष लागले आहे.
‘प्युअर व्हेज वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट’च्या यशस्वी वाटचालीनंतर वाघोली व परिसरातील खवय्यांना ‘हॉटेल प्रमिला’ फॅमिली रेस्टॉरंटच्या माध्यमातून काळ्या मसाल्यातील व्हेज-नॉनव्हेज पदार्थांची मेजवानी चाखायला मिळणार आहे. स्वच्छता, सर्विस, क्वालिटी देणारे पहिले पुणे-नगर महामार्ग वाघोली-आव्हाळवाडी रोडवर ‘हॉटेल प्रमिला’ हे व्हेज आणि नॉनव्हेज फॅमिली रेस्टॉरंट लवकरच ग्राहकांच्या सेवेत दाखल होत आहे.
वाघोली-आव्हाळवाडी रोडवरील ‘हॉटेल प्रमिला’ या नवीन फॅमिली रेस्टॉरंटमध्ये, आम्ही खास काळ्या मसाल्याच्या पारंपारिक चवींचा खजिना घेऊन येत आहोत. आईच्या हाताची चव आणि घरगुती वातावरण अनुभवण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण असेल. शाकाहारी आणि मांसाहारी स्वादिष्ट पदार्थांची मेजवानी एकाच छताखाली खवय्यांना चाखायला मिळेल. आमच्या सेवेचा आनंद घेण्यासाठी नक्की भेट द्या! – करण (दादा) थोरात (संचालक, हॉटेल प्रमिला)










