घोड धरणातील शेतीपंपांचे वीज कनेक्शन तोडण्यास स्थगिती

आमदार ज्ञानेश्वर आबा कटके यांच्या मध्यस्थीने शेतकऱ्यांचे आंदोलन मागे

शिरूर :  शिरूर तालुक्यातील घोड धरणातून शेतीसाठी पाणी वापरणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीपंपांचे वीज कनेक्शन तोडण्याच्या कार्यवाहीला स्थगिती मिळाली आहे. आमदार ज्ञानेश्वर माऊली आबा कटके यांनी या प्रकरणात तातडीने मध्यस्थी करत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांच्या पुढाकारामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याने निमोणे येथे सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आले.

घोड धरणातून शेतीसाठी पाणी वापरणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कार्यवाही सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. याविरोधात निमोणे, गुणाट, चिंचणी, गोलेगाव, शिंदोडी, तरडोबाचीवाडी, मांडवगण फराटा यांसह परिसरातील अनेक गावांतील शेतकऱ्यांनी निमोणे येथे आंदोलन सुरू केले होते.

या आंदोलनाची माहिती मिळताच आमदार ज्ञानेश्वर आबा कटके यांनी तातडीने पुढाकार घेत जलसंपदा विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन कोणत्याही शेतकऱ्याच्या शेतीपंपाचे वीज कनेक्शन तोडू नये, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित केल्यास शेतकऱ्यांसमोर शेतीच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन वीज कनेक्शन तोडण्याची कार्यवाही करू नये, अशी भूमिका आमदार कटके यांनी मांडली. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Download in JPEG Format

DM Admin

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button

You cannot copy content of this page