हवेली तालुक्यात विकासाची गंगा आणणार – मंगेश चिवटे

हवेली तालुका शिवसेनेची आढावा बैठक उत्साहात; विकासकामे आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यावर भर; प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार

पुणे : हवेली तालुका शिवसेनेची विशेष आढावा बैठक उत्साही वातावरणात पार पडली. या बैठकीला शिवसेना नेते तथा मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) मंगेश चिवटे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. हवेली तालुक्यात शिवसेनेच्या माध्यमातून व्यापक स्वरूपात विकासकामे हाती घेण्यात येतील, तसेच पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना ताकद दिली जाईल, अशी ग्वाही चिवटे यांनी यावेळी दिली.
बैठकीत मार्गदर्शन करताना मंगेश चिवटे म्हणाले, “हवेली तालुक्यात शिवसेनेच्या माध्यमातून विकासाची गंगा आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा शिवसेनेचा कणा आहे. तळागाळातील प्रत्येक कार्यकर्त्याला आवश्यक ती ताकद देऊन त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहोत. मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे.”
बैठकीचे प्रास्ताविक हवेली तालुका प्रमुख विपुलदादा शितोळे यांनी केले. जिल्हा समन्वयक अॅड. गणेश मस्के यांनी सूत्रसंचालन केले, तर युवासेना जिल्हाप्रमुख गणेश सातव-पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. बैठकीचे आयोजन हवेली तालुका प्रमुख विपुलदादा शितोळे, युवासेना जिल्हाप्रमुख गणेश सातव-पाटील आणि शिवसेना जिल्हा समन्वयक अॅड. गणेश मस्के पाटील यांनी केले होते.
यावेळी युवासेना संपर्कप्रमुख अनिकेत जावळकर, जिल्हाप्रमुख बापूसाहेब शिंदे, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख तृप्तीताई सरोदे, जिल्हा संघटक निलेश काळभोर, जिल्हा नियोजन समिती सदस्य अलंकार कांचन, उपजिल्हाप्रमुख शामराव माने आणि युवासेना तालुका प्रमुख विक्रम वाघमारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
बैठकीस हवेली तालुक्यातील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी तसेच असंख्य शिवसैनिक व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुक्यातील विकासकामांना गती देणे, जनतेचे प्रश्न सोडविणे आणि संघटनात्मक बांधणी मजबूत करणे, या विषयांवर बैठकीत भर देण्यात आला.

Download in JPEG Format

DM Admin

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button

You cannot copy content of this page