वाहतूक पोलिसांनी बुजवले रोडवरील खड्डे

वाहतुकीचे नियमन करण्याबरोबरच जपली सामाजिक बांधिलकी

वाघोली :  पावसामुळे अंतर्गत रस्त्यांसह महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. वाहनधारकांकडून खड्डे चुकवताना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अपघात होवू नये यासाठी वाहतुक नियमन करणाऱ्या वाहतूक पोलिसांनी कर्तव्य बजावण्याबरोबरच पुणे-नगर महामार्गावरील वाघेश्वर चौकातील खड्डे बुजवून सामाजिक बांधिलकी जपली आहे.

खड्डे बुजवत असताना वाहतूक पोलीस

पावसाळ्याचे दिवस असल्याने वाघोलीतील अंतर्गत रस्त्यांसह महामार्गावर मोठ्याप्रमाणावर खड्डे पडले आहेत. खड्यांमुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे. पुणे-नगर महामार्गावरून मोठ्याप्रमाणावर वाहने धावतात. महामार्गावर असलेल्या खड्ड्यांमुळे साहजिकच वाहनांचा वेग कमी होतो पर्यायाने वाहतूक कोंडी निर्माण होते. वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांना मोठी कसरत करावी लागते. तरी देखील वाहतूक पोलिस रस्त्यावरील खड्डे बुजवून नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेताना दिसून येत आहेत. खड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे वाहनधारकांना अंदाज येत नाही, अशावेळी अपघाता सामोरे जावे लागते.

रस्त्यावर खड्यांमुळे दुर्घटना होऊ नये यासाठी पोलीस हवालदार बि. टी. राख, पोशि डी. आर. खेडकर, पोना ज्योती गोसावी यांनी पुढाकार घेऊन पुणे-नगर महामार्गावरील वाघेश्वर चौकातील खड्डे सिमेंट, खडीने बुजवून सामाजिक बांधिलकी जपली आहे.

पावसाळा सुरु असून रस्त्यावर खड्डे पडले आहेत तर काही ठिकाणी रस्ता निसरडा झाला आहे. खड्यांमुळे व निसरड्या रस्त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकरता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी वाहन काळजीपूर्वक चालवून अपघात होणार नाही दक्षता घ्यावी 

जयंत पाटील (सहा. पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा)

Download in JPEG format

DM Admin

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button

You cannot copy content of this page