वाघोलीतील बंदिस्त गटारे साफ करण्याची मागणी

केतन जाधव यांचे मनपा क्षेत्रीय कार्यालयाकडे निवेदन

वाघोली: वाघोली येथील बंद लाईट चालू करणे, विद्युत पोल लावले, बंदिस्त गटार सफाई आदी कामे करण्यात यावी अशी मागणी भाजप वाघोली शहर अध्यक्ष केतन जाधव यांनी निवेदनाद्वारे नगर रोड वडगावशेरी महापालिका क्षेत्रीय कार्यालयाकडे केली आहे.

वाघोलीतील काही ठिकाणी बंद असलेले लाईट सुरु करावे तसेच आवश्यक असणाऱ्या ठिकाणी नवीन लाईटचे पोल बसवण्यात यावे. त्याचबरोबर वाघोलीत काही ठिकाणी पाणी साचते अशा ठिकाणी पावसाळा सुरु होण्यापूर्वी बंदिस्त गटारे साफ करावी अशी मागणी भाजपचे वाघोली शहर अध्यक्ष केतन जाधव यांनी महापालिका क्षेत्रीय कार्यालयाकडे केली आहे.

DM Admin

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button

You cannot copy content of this page