दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी सातव बंधूंचा पुढाकार

खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त धान्य वाटप उपक्रमासाठी ५ लाख २ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द

पुणे : पुणे शहराचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर (अण्णा) मोहोळ यांच्या वाढदिवस (९ नोव्हेंबर) विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जातो. यंदा दुष्काळग्रस्त कुटुंबांच्या घरात आनंदाची चूल पेटावी आणि त्यांच्या अडचणीच्या काळात त्यांना आधार मिळावा, या उद्देशाने दुष्काळग्रस्त कुटुंबांना धान्य वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

या सामाजिक उपक्रमाला प्रतिसाद देत भाजपा पुणे शहर मा. चिटणीस केतन (भैय्या) जाधव यांनी वैयक्तिक स्वरूपात २ लाख ५१ हजार रुपये, तसेच पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामकृष्ण (अण्णा) सातव पाटील यांच्या वतीने २ लाख ५१ हजार रुपये, अशी एकूण ५ लाख २ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. या मदतीचा धनादेश लोकप्रिय खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर (अण्णा) मोहोळ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी बांधव आणि त्यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने हा निधी देण्यात आला आहे. वाढदिवस केवळ उत्सव म्हणून साजरा न करता सामाजिक बांधिलकी जपत गरजू कुटुंबांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद, संदीप (आप्पा) भोंडवे, पुणे महापालिकेचे नगरसेवक अनिल सातव पाटील, माजी नगरसेवक राहुल आप्पा भंडारे, सुनील (चाचा) जाधवराव, प्रदीप सातव, राहुल वराळ, प्रवीण घोरपडे, विजय जाचक आदी मान्यवर उपस्थित होते.

वाढदिवस साजरा करताना केवळ शुभेच्छा आणि सत्कार यांपुरते मर्यादित न राहता समाजातील गरजू घटकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणे हीच खरी सामाजिक बांधिलकी आहे. खासदार मुरलीधर (अण्णा) मोहोळ यांनी दुष्काळग्रस्त कुटुंबांसाठी धान्य वाटपाचा घेतलेला पुढाकार अत्यंत स्तुत्य आहे. त्यामध्ये आम्ही खारीचा वाटा उचलला आहे.

– केतन (भैय्या) जाधव  (मा. चिटणीस, भाजपा, पुणे शहर)

Download in JPEG Format

DM Admin

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button

You cannot copy content of this page