संशयित पाच दुचाकींसह अटक

रिसोड पोलिसांची कारवाई; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत; वाशिम, हिंगोलीसह पुणे जिल्ह्यातील गुन्ह्यांची उकल

रिसोड : रिसोड (जि. वाशीम) शहरासह परिसरात दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी रिसोड पोलिसांनी विशेष मोहीम राबवून एका संशयितास ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून विविध कंपन्यांच्या पाच चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, या कारवाईमुळे रिसोडसह हिंगोली आणि पुणे जिल्ह्यातील चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे.

या कारवाईत पोलिसांनी सदानंद टॉकीजजवळ राहणाऱ्या अंकुश विश्वनाथ राऊत (वय ३०) याला संशयावरून ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याच्याकडून दोन हिरो स्प्लेंडर, एक हॉरनेट, एक प्लॅटिना आणि एक शाईन अशा एकूण पाच जुन्या वापरत्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. जप्त केलेल्या या वाहनांची अंदाजे किंमत दोन लाख ऐंशी हजार रुपये आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

तपासादरम्यान, रिसोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याव्यतिरिक्त गोरेगाव पोलीस ठाणे (जि. हिंगोली) येथील तसेच भोसरी पोलीस ठाणे (जि. पुणे) येथील चोरीच्या गुन्ह्यांचाही उलगडा झाला आहे.

सदरील कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मास्कर, पोलीस हवालदार गजानन झगरे, सुरज खंडके, ज्ञानदेव मात्रे, पोलीस अंमलदार अमोल इरतकर, पोकॉ सुनील तायडे यांनी केली आहे. यांच्या पथकाने केली.

Download in JPEG Format

DM Admin

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button

You cannot copy content of this page