गोळीबार करून जबरी चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीवर ‘मोक्का’

लोणीकंद पोलीसांकडून कारवाई

वाघोली : लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत जबरी चोरीच्या उद्देशाने गावठी पिस्टलमधून गोळीबार करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीवर ‘मोक्का’ (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

पाच ऑगस्ट रोजी रात्री गावडेवाडी-शिरसवडी रोड येथे उद्योजक चारचाकी गाडीतून जात असताना तीन अनोळखी इसमांनी त्यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर गोळीबार करून गंभीर जखमी केले आणि त्यांच्या गळ्यातील २२ तोळ्यांच्या सोन्याच्या दोन चैनी जबरदस्तीने हिसकावून नेल्या. याप्रकरणी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, या गुन्ह्यात अविनाश कृष्णचंद्र त्रिपाठी (रा. बकोरी, मूळ रा. उत्तर प्रदेश), मोहम्मद शोएब वसीम खान सिद्दीकी आणि सुरेंद्र रामचंद्र पाल (रा. दोघेही रा. उत्तर प्रदेश) या तिघांना उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आली होती.

मुख्य आरोपीत अविनाश त्रिपाठी याचा पूर्व गुन्हेगारी इतिहास अत्यंत गंभीर असून, त्याच्यावर पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर, कोरेगाव पार्क, हडपसर तसेच उत्तर प्रदेशमधील वजीरगंज, पीजीआय, बाराबाकी, चिनहट व लखनऊ येथे खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, खुनासाठी अपहरण करणे आणि उत्तर प्रदेश गिरोहबन्द समाज विरोधी क्रियाकलाप (निवारण) अधिनियम १९८६ यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच इतरांवरही अपहरण, जबरी चोरी व चोरीचे गुन्हे नोंद आहेत. हे आरोपीत हिंसक मार्गाचा अवलंब करून स्वतःचे वर्चस्व राहावे म्हणून संघटितपणे गुन्हे करत असल्याचे पूर्व गुन्हे अभिलेखावरून दिसून आल्याने त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ (मोक्का) अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

» वाघोली-लोणीकंद हद्दीत २२ जणांवर तडीपारीची कारवाई

परिमंडळ ७ अंतर्गत विविध गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या चौघांवर पोलीस उपायुक्त अबिनाश कुमार यांनी तडीपारीची कारवाई केली. यामध्ये केसनंद येथील तळेरानवाडीमधील राहुल सुखदेव राखपसरे (वय ३२) याचाही समावेश आहे. जानेवारी २०२६ पासून आजपर्यंत वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १०, तर लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १२ अशा एकूण २२ जणांना तडीपार करण्यात आले आहे.

सदर कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संजय दराडे, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त अबिनाश कुमार, सहा.पोलीस आयुक्त अतिना मोरे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिता रोकडे, पोलीस निरीक्षक गुन्हे स्वाती खेडकर, सहा.पोलीस निरीक्षक देविदास शेवाळे, गजानन कागणे, पोना गणेश दळवी, पोअं शुभम सातव, पोअं विठ्ठल केदारी, मपोअं ज्योती कुटे यांनी केली आहे.

Download in JPEG Format

DM Admin

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button

You cannot copy content of this page