दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लोणीकंद पोलिसांची मोठी कारवाई

१२८ ग्रॅम अंमली पदार्थ आणि ३ पिस्टलसह ७ जण जेरबंद

पुणे : (दीपक नायक) दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर लोणीकंद पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, तब्बल १२८.३ ग्रॅम मॅफेड्रॉन (एमडी) ड्रग्ज, ३ देशी बनावटीची पिस्टल आणि ५ जिवंत काडतुसांसह एकूण ७ जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी ड्रग्ज, शस्त्रे, तीन कार आणि मोबाईल असा एकूण २३ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकंद पोलिसांच्या तपास पथकाने २९ ऑक्टोबर रोजी पेट्रोलिंग दरम्यान कटकेवाडी फाटा येथून प्रतिक उर्फ सोन्या होले (रा. लोणीकंद) याला ताब्यात घेण्यात आले होते. त्याच्याकडून १९.४ ग्रॅम एम.डी. ड्रग्ज, १ देशी पिस्टल व २ जिवंत काडतुसे आणि कार असा ९ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

त्याच्याकडे केलेल्या चौकशीच्या आधारे विशाल शिवाजी माकर (रा. शिरूर) आणि सोमनाथ संजय गोरे (रा. हडपसर) यांना खंडोबामाळ, लोणीकंद येथून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून २ देशी पिस्तूल आणि ३ जिवंत काडतुसे असा ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून अटक करण्यात आली.

तदनंतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे जुना टोल नाका, पेरणे फाटा येथे सापळा रचून विशाल उर्फ दादा रामदास कोलते (रा. बकोरी), राजुराम उमेदराम चंवेल (चौधरी) (रा.शिरूर), वैभव बाळू खेडकर (रा. शिरूर) आणि शिवम प्रशांत देडगे (रा. शिरूर) या चार जणांना जेरबंद करण्यात आले. त्यांच्याकडून १०८.९ ग्रॅम एम.डी. ड्रग्ज आणि २ कार असा १३ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून चौघांना अटक करण्यात आली. अंमली पदार्थ व शस्त्रांच्या पुरवठा साखळीचा तसेच गुन्हेगारी नेटवर्कमधील फॉरवर्ड व बॅकवर्ड लिंकेजचा सखोल शोध घेतला जात आहे.

सदर कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संजय दराडे, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त अबिनाश कुमार, सहा.पोलीस आयुक्त अतिना मोरे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिता रोकडे, पोलीस निरीक्षक गुन्हे स्वाती खेडकर, सहा.पोलीस निरीक्षक देविदास शेवाळे, गजानन कागणे, पोना  गणेश दळवी, पोअं शुभम सातव, पोअं विठ्ठल केदारी, मपोअं ज्योती कुटे यांनी केली आहे.

Download in JPEG Format

DM Admin

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button

You cannot copy content of this page