वकीलास मारहाण करणे भोवले

वाघोली : वाहतूक कोंडी सोडविताना एका वकिलाशी झालेल्या वादानंतर कथित मारहाणीच्या प्रकरणात लोणीकंद पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई नितीन सोमनाथ पोंधे यांची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मुख्यालयात रवानगी केली आहे.

३१ जुलै २०२६ रोजी वाहतूक नियमनाचे कर्तव्य बजावत असताना पोलीस शिपाई नितीन पोंधे आणि दुचाकीस्वार वकील साहिल दिलावर शेख यांच्यात वाहतूक कोंडीच्या कारणावरून शाब्दिक वाद झाला. त्यानंतर वकिलाची कॉलर पकडून मारहाण करत त्यांना लोणीकंद पोलीस ठाण्यात आणल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या घटनेची गंभीर दखल घेत १ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी संबंधित पोलीस शिपायाविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी करत लोणीकंद पोलीस ठाण्यात निवेदन दिले होते.

यानंतर लोणीकंद पोलीस ठाण्याकडून संबंधित पोलीस शिपायाचा कसुरी अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला. अहवालाची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस शिपाई नितीन सोमनाथ पोंधे यांची मुख्यालयात रवानगी करण्याचे आदेश दिले. या कारवाईमुळे संबंधित प्रकरणाची जिल्ह्यात चर्चा सुरू झाली असून पुढील चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यापूर्वी सुद्धा घडली होती अशीच घटना? 

यापूर्वी सुद्धा याच पोलीस स्टेशनमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने वकिलांना अशाच प्रकारे अरेरावी केल्याची घटना घडल्याचे समोर येत आहे. त्यामुळे पोलीस वकिलांना अशी वागणूक देत असतील तर सामान्यांना कशी वागणूक देत असतील असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. पुणे पोलीस आयुक्त यांनी अशा अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना समज देणे गरजेचे असल्याची भावना सामान्यांमधून व्यक्त केली जात आहे.  

संबंधित घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून प्राथमिक अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. त्यांच्या आदेशानुसार संबंधित पोलीस शिपायाची मुख्यालयात रवानगी करण्यात आली आहे. प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून चौकशी अहवालानुसार पुढील आवश्यक प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

– सुनिता रोकडे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद)

DM Admin

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button

You cannot copy content of this page