भावडी रोडच्या डागडुजीसाठी ५० लाखांचा निधी

नगरसेवक अनिल सातव पाटील यांची माहिती; पावसाळ्यापूर्वी कामांना वेग

वाघोली : परिसरातील अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा भावडी रोड सध्या अतिशय खराब अवस्थेत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः येणाऱ्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या रस्त्याची दुरवस्था अधिकच गंभीर ठरण्याची शक्यता निर्माण झाल्याने भावडी रोडच्या डागडुजीसाठी ५० लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती प्रभाग तीनचे नगरसेवक अनिल सातव पाटील यांनी दिली.

भावडी रोडच्या दुरावस्थेबाबत नगरसेवक सातव यांनी तात्काळ पथ विभागाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधल्यानंतर प्रत्यक्ष प्रभाग तीनचे नगरसेवक रामभाऊ दाभाडे, नगरसेवक अनिल सातव पाटील यांनी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रस्त्याची पाहणी करण्यात आली. त्यानंतर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तातडीने पालिकेच्या मुख्य खात्यातून ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. रस्त्याच्या डागडुजीच्या कामांना सुरुवात झाली आहे. सद्या रस्त्याच्या डागडुजीचे काम सुरु असले तरी येत्या काही महिन्यांतच अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून पावसाळ्यात होणारा त्रास कमी होणार आहे.

यावेळी प्रभाग तीनचे नगरसेवक रामभाऊ दाभाडे, नगरसेवक अनिल सातव पाटील व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

» नागरिकांमधून व्यक्त होत आहे समाधान

» दरवर्षी पावसाळ्यात होणाऱ्या त्रासापासून मिळणार सुटका

» भावडी रोडचा कायमस्वरूपी प्रश्न मार्गी लावण्यासाठी सुमारे २० कोटी रुपयांच्या प्रकल्पीय निधीसाठी पाठपुरावा सुरू  

संपूर्ण भावडी रोडचा कायमस्वरूपी व दर्जेदार विकास व्हावा यासाठी सुमारे २० कोटी रुपयांच्या प्रकल्पीय निधीसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. नागरिकांच्या मुलभूत सोयीसुविधा आणि सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी सदैव तत्पर आहे. – अनिल सातव पाटील (नगरसेवक, मनपा, पुणे)

Download JPG File

DM Admin

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button

You cannot copy content of this page