झोपडपट्टीतील लहान मुलांना खाऊ व कपडे वाटप
राज्यमंत्री बच्चु कडू यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
वाघोली : राज्यमंत्री बच्चु भाऊ कडू यांच्या ५१ वा वाढदिवसानिमित्त वाघोलीमध्यें पाल (झोपडी) राहत असलेल्या ५१ लहान मुलांना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेन्द्र सातव, अनिता कांबळे, सुप्रिया लोखंडे, नंदू कोळेकर यांच्या हस्ते नवे कपडे व चॉकलेट, केक व खाऊचे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी मुलांच्या चेहऱ्यावर ओसांडून आनंद वाहत होता.
प्रहार संघटनेच्या वतीने राज्यभर बच्चु कडू यांचा वाढदिवस विधायक कार्यक्रमांद्वारे साजरा केला जातो. त्याचाच भाग म्हणून सुप्रिया लोखंडे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष, मा. अध्यक्ष अनिता कांबळे यांच्या पुढाकाराने वाढदिवसाचा कार्यक्रम दरवर्षी प्रमाणे यावर्षीही वाघोली येथील झोपडीत राहणाऱ्या लहान मुलांच्या मुलाच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. समाजातील उपेक्षित आणि गरजु मुलांना कपड्याची भेट देऊन खाऊचे वाटप करून गरजूंना मदतीचा हात देणे हीच खरी सामाजिक बांधिलकी असल्याचे धर्मेंद्र सातव यांनी सांगितले. यावेळी धर्मेंद्र सातव, सुप्रियाताई लोखंडे, अनिता कांबळे, नंदू कोळेकर आदि उपस्थित होते.










