ड्रोनद्वारे गौण खनिजची मोजणी

लोणीकंद, भावडी परिसरातील खाण व्यवसायिकांचे दणाणले धाबे

वाघोली : पुणे जिल्ह्याच्या पूर्व पट्ट्यातील वाघोली नजीकच्या लोणीकंद तसेच भावडी परिसरातील खाणींची गौण खनिज तहसीलदार ज्योती देवरे यांनी पोलीस बंदोबस्तामध्ये ड्रोनद्वारे मोजणी केली. त्यामुळे दगड, खाण व्यवसायिकांचे चांगली धाबे दणाणले.
लोणीकंद, भावडी परिसरामध्ये अनेकांचे दगड क्रेशर खाणींचे उद्योग आहेत. खाणींचा परवाना संपल्यानंतर काही दगड क्रेशर खाण व्यावसायिक चोरून उत्खनन करत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. त्याचप्रमाणे पूर्वीच्या परवानगीमध्ये अनेक खाण व्यवसायिकांनी शासनाला भरलेल्या रॉयल्टीपेक्षा कितीतरी पटीने अधिक गौण उत्खनन केल्याचे महसूल विभागाच्या निदर्शनास आले आहे. शासनाचा लाखो रुपये महसूल बडविणाऱ्या दगड, खान चालकांवर गौण खनिज तहसीलदार ज्योती देवरे यांनी बेधडकपणे, खान उद्योगांमध्ये झालेल्या उत्खननाची ड्रोनद्वारे शुक्रवारी (दि. २१) अचानक अचानक मोजणी चालू केल्याने खान उद्योजकांचे धाबे दणाणले आहेत. तहसीलदार देवरे खाण उद्योगाच्या ठिकाणी ताफ्यासह पोहचताच खाण उद्योजक वाहतूकदार यांची पळापळ झाली. काही वेळातच एकमेकांना संदेश पोहचवत वाहतूक करणाऱ्या गाड्या पूर्णपणे बंद झाल्याचे चित्र दिसून आले.
पोलिसांच्या सतर्कतेमुळे खबऱ्याची पोलखोल
दगड खान व्यवसायिकांच्या ग्रुपमधील एक खबऱ्या तहसीलदार यांच्या लोकेशनबद्दल खाण व्यवसायिकांना माहिती देत होता. परंतु लोणीकंद पोलिसांच्या सतर्कतेमुळे खबऱ्याची पोलखोल झाल्याने संदेश जाणे बंद झाले.

DM Admin

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button

You cannot copy content of this page