सोनाली गवांडे यांची संयोजिकापदी निवड
पुणे : विश्व हिंदू परिषद मातृशक्तीची बैठक वाघोली येथे शनिवारी (दि. २९ जुलै) संपन्न झाली. या बैठकीमध्ये सोनाली नाथ गवांडे यांची विश्व हिंदू परिषद मातृशक्ती पुणे पुर्व विभागाच्या संयोजिकापदी निवड करण्यात आली. पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री संजय मदराळे यांनी ही निवड केली. त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन होत आहे.
यावेळी विश्व हिंदू परिषद विभाग मंत्री धनंजय गायकवाड, संतोष अंगोलकर, सूरज घाडगे, शिवाजी गोते, अनुराधा भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. संघटनेनी दिलेली जबाबदारी उत्कृष्टपणे सांभाळणार असून देश आणि धर्म कार्यासाठी काम करणार असल्याचे सोनाली गवांडे यांनी सांगितले.










