कर्मभूमीनगरमध्ये भरदिवसा घरफोडी

पाच हजारांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने चोरीला

लोहगाव : लोहगाव-वाघोली रस्त्यावरील कर्मभूमीनगर परिसरात बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे एक लाख ८७ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. १२ नोव्हेंबर रोजी भरदिवसा ही घरफोडी झाली. याप्रकरणी लोहगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्मभूमीनगर येथील साईवंदन बिल्डिंग, फ्लॅट क्रमांक ११, लेन क्रमांक १ येथे ही घटना घडली. फिर्यादी यांचा फ्लॅट कुलूप लावून बंद असताना अज्ञात चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप कशाच्या तरी साहाय्याने उचकटून घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील कपाट उघडून त्यातील पाच हजार रुपये रोख आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १ लाख ८७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार गायकवाड करीत आहेत.

दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये अज्ञात व्यक्तींकडून ठिकठिकाणी चोरीचा प्रयत्न झाल्याचे दिसून येत असल्याची माहिती आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

» वाढत्या घरफोड्यांच्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

लोहगाव परिसरात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. बंद घरे हेरून चोरट्यांकडून चोरी केली जात असताना या घटनांचा छडा लावण्यात पोलिसांना अपेक्षित यश मिळत नसल्याची नागरिकांची भावना आहे. वारंवार घडणाऱ्या घरफोड्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पोलिसांनी गस्त वाढवून चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

Download in JPEG Format

DM Admin

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button

You cannot copy content of this page