यवत पोलीस स्टेशनमध्ये पोलीस पाटलांची बैठक संपन्न
गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस पाटलांची भूमिका महत्वाची - पो.नि. नारायण पवार
दौंड : कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी यवत पोलीस स्टेशन हद्दीतील गावांमधील पोलीस पाटील यांची बैठक संपन्न झाली.
दिवसेंदिवस वाढणाऱ्या चोरीच्या घटना व अवैध धंद्यांवर अंकुश ठेवण्यासाठी यवत पोलीस स्टेशनमध्ये गुरुवार (११ नोव्हेंबर) रोजी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या गावातील पोलीस पाटलांची बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी उपस्थित पोलीस पाटील यांना मार्गदर्शन केले. अवैध धंदे, चोऱ्या, सामाजिक अशांतता निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस पाटील यांनी महत्वाची भूमिका असल्याचे सांगितले. दरम्यान उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पोलीस पाटल यांना प्रशंसापत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी पोलीस निरीक्षक पवार, पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोखंडे, पोलीस कर्मचारी व पोलीस पाटील उपस्थित होते.
गुन्हेगारांनी घेतली धास्ती
यवत पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक पवार हे रुजू होताच चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारींची चोरी करून अप्रत्यक्ष सलामीच दिली. मात्र पोलीस निरीक्षक पवार यांनी देखील सलामी स्वीकारत विद्युत मोटारी चोरी करणारी आंतरराज्य टोळीला जेरबंद बंद करण्यात यश मिळविले. पवार यांच्या धडाकेबाज कारवाईने गुन्हेगारांनी चांगलीच धास्ती घेतली आहे.










