वाघोलीतील प्रश्नांसंदर्भात पुणे महापालिका आयुक्तांची आमदार अशोक पवार यांनी घेतली भेट
वाघोली : महापालिकेत समावेशा झाल्यानंतर वाघोलीतील विविध प्रश्नांच्या मागण्यांसाठी पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांची आमदार अशोक पवार यांनी वाघोलीतील शिष्टमंडळासह भेट घेतली.
वाघोलीसाठी भामा-आसखेडचे पाणी मिळावे, वाघोलीतील झोपडपट्टीधारकांना एस.आर.ए. मार्फत पक्की घरे मिळावीत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांचा समावेश पुणे महानगरपालिकेत करण्यात यावा, वाघोलीत महानगरपालिका अंतर्गत लसीकरण सुरू करण्यात यावे, वाघोली अंतर्गत जकात नाका ते कटकेवाडी १०० फुटी डी.पी. रस्त्याला गती देण्यात यावी, पी.एम.सी.चे क्षेत्रीय कार्यालय वाघोली मध्ये सुरू करण्यात यावे, वाघोली ग्रामपंचायतीच्या मार्फत मंजूर कामांना गती देण्यात यावी, घनकचरा व्यवस्थापन करण्यात यावे इत्यादी मागण्यांचे निवेदन आयुक्तांना देण्यात आले.










