अखेर सत्याचाच विजय – शांताराम कटके

वाघोली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पेढे भरवून आनंदोत्सव

पुणे : नुकताच केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह बहाल करण्यात आले असल्याचा निकाला दिला. त्यामुळे वाघोली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पुणे-नगर महामार्गालगत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर वाघोली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी फटाकडे वाजवून व एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला. याप्रसंगी वाघोली गावचे माजी उपसरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शांताराम कटके यांनी अखेर सत्याचा विजय झाला असल्याची भावना व्यक्त केली.

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह बहाल करण्यात आल आहे. राज्यसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने दिलेला हा निर्णय शरद पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

अजित पवार गटाकडून निर्णय येताच वाघोली गावचे माजी उपसरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शांताराम कटके यांचेसह वाघोली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मोठा जल्लोष साजरा करण्यात आला.

उशिरा का होईना अखेर सत्याचाच विजय झाला आहे. अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली जसा विकास होत गेला. त्याबरोबरच पक्ष देखील महाराष्ट्रात नंबर वनचा होणार. – शांताराम (बापू) कटके (माजी उपसरपंच)

यावेळी वाघोली गावचे माजी उपसरपंच शांताराम (बापू) कटके, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष सोमनाथ आव्हाळे, देवराम तांबे, माजी जिल्हा परिषद सदस्या अर्चनाताई कटके, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष गणेश सातव, अनिल आव्हाळे, गणेश हरगुडे, अबिद भाई शेख, गुलाब सातव पाटील, नारायण मोरे, मोहन हरगुडे, प्रकाश हरगुडे, संपत जगताप, करण थोरात, सुषमा जोर्वे, कुंदा डफळ, रूपाली सातव, ज्योती थोरात, राणीताई आव्हाळे, प्रतीक शिवरकर, मुकेश बेंडावले, ज्ञानेश्वर घायतडक, प्रणव महाजन, मोहन सातव, चंद्रकांत गाडोते, मोनिका हिंगे, पूजा मिश्रा, सुजित भगत, आदित्य केकान, गोरख सातव आदी उपस्थित होते.

Download in JPEG format

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button

You cannot copy content of this page