स्ट्रीट लाईट, रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी
संदीप सातव यांचे मनपा सहा. आयुक्त यांना लेखी निवेदन
वाघोली : वाघोली येथील अनेक भागातील स्ट्रीट लाईट बंद आहेत. त्याबरोबर अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. तातडीने स्ट्रीट लाईट सुरु करून रस्ते दुरुस्त करण्यात यावे अशी मागणी माजी उपसरपंच संदीप सातव यांनी निवेदनाद्वारे पुणे मनपा नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त सोमनाथ बनकर यांचेकडे केली आहे.
वाघोली गाव पुणे महानगर पालिकेत समाविष्ट होवून दोन वर्ष झाले. परंतु अनेक भागातील स्ट्रीट लाईट बंद आहेत. तसेच अनेक भागातील अंतर्गत रस्ते अत्यंत खराब झाले आहेत. नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. पुणे महानगर पालिका अधिकारी यांचेकडे सातव यांनी अनेकवेळा पाठपुरावा केला परंतु समस्या मार्गी लागल्या नाहीत. लवकरच स्ट्रीट लाईट चालू करावे व अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी संदीप सातव यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.










