शेतकरी ते थेट ग्राहक आठवडे बाजाराचे उद्घाटन
वाघोलीतील नागरिकांना मिळणार ताजा व सेंद्रिय भाजीपाला रास्त दरात
वाघोली : ज्ञानेश्वर कटके, अनिल सातव पाटील व सुनीता अनिल सातव पाटील यांच्या संकल्पनेतून विंग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. आयोजित शेतकरी ते थेट ग्राहक आठवडे बाजाराचे उद्घाटन संपन्न झाले. यामध्ये सेंद्रिय भाजीपाला रास्त दरात मिळणार असून नागरिकांना याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर (आबा) कटके, अनिल (भाऊ) सातव पाटील व सुनिता सातव पाटील यांच्या संकल्पनेतून नागरिकांना सेंद्रिय भाजीपाला स्वस्त दरात मिळावा यासाठी वाघोली येथील फुलमळा भावडी रोड येथे विंग्रो फार्मर प्रोड्युसर लिमिटेड कंपनीच्या वतीने शेतकरी ते थेट ग्राहक आठवडे बाजाराचे आयोजन करण्यात आले.

नुकतेच या बाजाराचे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले असून पहिल्याच आठवडे बाजाराला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. दर शनिवारी सायंकाळी ४ ते ९ या वेळेत भावडी रोडवरील आदित्य नंदनवन सोसायटी, मॅजेस्टिक मॅनहॅटन सोसायटी समोर हा बाजार भरेल. या बाजारात सर्व प्रकारचा भाजीपाला, फळे, धान्य, कडधान्य व सेंद्रिय भाजीपाला स्वस्त दरात नागरिकांना मिळणार आहे. नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन जि. प. सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी केले आहे.
आरोग्याच्या दृष्टीने वाघोलीमधील नागरिकांना दैनंदिन वापरातील जीवन आवश्यक गोष्टी स्वच्छ, ताज्या, सेंद्रिय स्वरूपात व रास्त दरात मिळाव्यात हा यामागील मुख्य उद्देश आहे.
– सुनिता सातव पाटील (माजी ग्रामपंचायत सदस्या)










